आमच्या विषयी
Our Story
संस्थेविषयी..........
सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला ची स्थापना सांगोला तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, दीन-दलित, मजूर वर्गातील मुलांना शिक्षणाची दारे खुली व्हावीत या प्रामाणिक उद्देशाने मा. आ. डॉ. गणपतरावजी देशमुख व त्यांचे निष्ठावंत सहकारी यांनी १५ मे १९६९ रोजी केली. संस्थेची सुरुवात एका छोट्या इमारतीतून एका प्रचंड मोठ्या वटवृक्षामध्ये रुपांतरीत झाली.
२५ जून १९८८ साली संस्थेने कनिष्ठ महाविद्यालय सुरु केले. सध्या कला विभाग, शास्त्र विभाग व किमान कौशल्य (+२) विभाग या विविध विभागातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
आज मितीस पूर्व प्राथमिक, प्राथमिक, उच्च माध्यमिक, व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम व वरिष्ठ महाविद्यालय अशा विविध शाखा अत्यंत चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत.
संस्थेच्या विविध विभागातून आज शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रामाणिक प्रयत्नातून विद्यार्थ्यांच्या जडण-घडणीत मोलाचे योगदान देत आहेत.

मूळ मूल्ये
आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाची वैशिष्ट्ये
आमचे ध्येय
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणे.
राष्ट्रासाठी चांगले मनुष्यबळ निर्माण करणे.
विद्यार्थ्यांना मानवी नीतिमत्ता, संस्कृती आणि वारशाची जाणीव करून देणे.
आमची दृष्टी
सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना आणि अध्यापन, शिक्षण आणि संशोधन प्रक्रियेसाठी मैत्रीपूर्ण वातावरणात दर्जेदार उच्च शिक्षण प्रदान करणे. विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर सक्षम, कुशल आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम मानवी शक्ती बनण्यासाठी घडवणे.
आमची मूल्ये
उच्च शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक करण्यास सरकारला मदत करणे. ज्ञानावर आधारित विकास. सामाजिक-आर्थिक बदल आणि शाश्वत विकासासाठी समावेशक वाढ.
संस्था पदाधिकारी

मा. डॉ. अनिकेत चंद्रकांत देशमुख
अध्यक्ष

मा. श्री. रामचंद्र शंकरराव खटकाळे
उपाध्यक्ष

मा. श्री. विठ्ठलराव सखाराम शिंदे
चिटणीस

मा. श्री. बबनराव विठ्ठल जानकर
संचालक

मा. श्री. चंद्रकांत गणपतराव देशमुख
संचालक

मा. डॉ. अशोकराव विठ्ठलराव शिंदे
संचालक

मा. श्री. दिपक रामचंद्र खटकाळे
संचालक

मा. श्री. अवधुत चंद्रकांत कुमठेकर
संचालक

मा. श्री. जयंत बबनराव जानकर
संचालक
प्रशासकीय विभाग




